ग्रामीण साहित्यातला आधारवड हरपला
ज्येष्ठ साहित्यिक रा. रं . बोराडे यांना श्रध्दांजली
सातारा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारातर्फे ज्येष्ठ साहित्यिक रा. रं . बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .यावेळी मसाप शाखा शाहूपूरी , ग्रंथमहोत्सव समिती , साहित्य कला विकास प्रतिष्ठान , अश्वमेध ग्रंथालय , शिवाजीराव चव्हाण ग्रंथालय या साहित्य संस्थातर्फेही श्रध्दांजली वाहण्यात आली .
यावेळी शिरीष चिटणीस म्हणाले र वा दिघे ,आनंद यादव आणि रा. रं . बोराडे यांनी ग्रामीण साहित्यात मोलाचे योगदान दिले त्यांचे साहित्यामधून ग्रामीण माणूस त्याच्या समस्या यांचे चित्रण आले .बोराडे यांचे साहित्य नवीन पिढीसमोर येणे महत्त्वाचे आहे त्यासाठी त्यांच्या साहित्यावर चर्चा होणं गरजेचं आहे .
डॉक्टर राजेंद्र माने म्हणाले बोराडे सर हे लेखक म्हणून आणि साहित्यिक म्हणून थोर होते .मातीशी घट्ट नाळ असणारा असा साहित्यिक खूप कमी पाहायला मिळतो .नवीन ग्रामीण साहित्यिकांना बोराडे सर यांनी प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली त्याचबरोबर दरवर्षी स्वखर्चाने नवीन साहित्यिकाच्या चांगल्या कलाकृतीला ते पुरस्कार देत होते .साहित्य मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे ते अध्यक्ष होते त्या काळात त्यांनी मराठी भाषेसाठी खूप काम केले त्यांच्या जाण्याने ग्रामीण साहित्याचा आधारवड कोसळला आहे
मुकुंद फडके म्हणाले आमदार सौभाग्यवती सारखी कादंबरी त्यांना चिरंजीव बनवून गेली .त्यातील ग्रामीण स्त्री आणि राजकारण यांचे चित्रण आणि बारकावे त्यांनी अत्यंत सूक्ष्म रीतीने शब्दबद्ध केले आहेत त्यावरून श्रीनिवास जोशी यांनी उत्तम नाटकाची बांधणी केली .
डॉक्टर श्याम बडवे यांनी बोराडे सरांनी लिहिलेल्या साहित्याचा आढावा घेतला आणि त्यातील काही कादंबऱ्या आणि कथासंग्रह यांचा उल्लेख दस्तऐवज म्हणून केला जाईल असे सांगितले
प्राध्यापक श्रीधर साळुंखे यांनी प्राचार्य बोराडे सर यांनी ग्रामीण साहित्यिकांना प्रोत्साहन दिले आणि लिहिते केले आणि सातत्याने त्यांची पाठराखण केली असे मत व्यक्त केले
नंदकुमार सावंत यांनी काही वर्षापूर्वी बोराडे सर विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तेंव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वा तील साधेपणाने भारावून गेलो होतो सांगत यापूर्वीच त्यांना सन्मानाने अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद द्यायला पाहिजे होते असे मत व्यक्त केले .
यावेळी पद्माकर पाठकजी ,आनंद ननावरे ,प्राध्यापक संजीव बोंडे , रुपाली मुळे विष्णू धावडे प्रकाश शिंदे व वाचक उपस्थित होते
फोटो ओळ
ज्येष्ठ साहित्यिक रा. रं . बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण करताना विविध साहित्य संस्थांचे प्रतिनिधी

