डॉ राजेंद्र माने यांच्या ‘ मौनाचं कुलूप ‘ला पुरस्कार


साहित्यिक शंकर पाटील स्मृत्यर्थ उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार

Advertisement

पुणे
म.सा. प. शाखा राजगुरुनगर पुणे मार्फत ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ जयंतीनिमित्त देण्यात येणारा साहित्यिक शंकर पाटील स्मृत्यर्थ उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार डॉक्टर राजेंद्र माने यांच्या ‘ मौनाचं कुलूप ‘ या कथासंग्रहाला प्रसिद्ध लेखक केशव सखाराम देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
यावेळी बोलताना प्रा केशव सखाराम देशमुख म्हणाले पद्मश्री नामदेव ढसाळ कुठल्याही विद्यापीठाचे पदवीधर नव्हते तर ते माणसांच्या विद्यापिठातले पदवीधर होते. ढसाळ हा जागतिक कवी होता. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे म्हणजे साहित्यिकांसाठी महत्वाची नांदी आहे .
याप्रसंगी धनाजी घोरपडे, सचिन शिंदे, किरण भावसार, भारत सातपुते, संतोष आळंजकर, डॉ. राजेंद्र माने यांना साहित्य पुरस्कारांनी सन्मानित केले गेले
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा राजगुरुनगर चे अध्यक्ष श्री सतीश गाढवे उपस्थित होते .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!