अक्षय कुमारला कोरोनाची लागण


मुंबई
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे.मात्र, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा मात्र, या विवाह सोहळ्यात सहभागी होणार नाही.अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अक्षय कुमार आता या विवाह सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही.
‘सरफिरा’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्याने स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. केवळ अक्षय कुमारच नाही तर ‘सरफिरा’च्या टीममधील आणखी काही लोकही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
‘सरफिरा’च्या प्रोडक्शन हाऊसच्या जवळच्या सूत्राने ही माहिती दिली आहे. सूत्राने सांगितले की, “अक्षय कुमार त्याच्या ‘सरफिरा’ चित्रपटाचे प्रमोशन करत होता. प्रमोशनच्या वेळी त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. मग त्याला समजले की, प्रमोशन करणाऱ्या टीमचे काही क्रू सदस्य कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांची कोविड चाचणी केली आणि शुक्रवारी सकाळी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!