साताऱ्यात शनिवारी लेखक तुमच्या भेटीला उपक्रम
लेखिका राजश्री शहा यांच्यासोबत होणार संवाद
सातारा
आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता लेखक तुमच्या भेटीला हा उपक्रम होणार आहे दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये लेखिका राजश्री शहा यांच्याशी संवाद साधला जाणार आहे राजश्री शहा यांनी अनुवादित केलेले व्हाईट टॉर्चर पुस्तक तसेच मुलांच्या जडणघडणीतील विविध प्रयत्न आणि प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतलादेवी यांच्याशी त्यांचा असलेला ऋणानुबंध याविषयी राजश्री शहा या कार्यक्रमात संवाद साधतील सविता कारंजकर संवादक असणार असून उपक्रम समन्वयक स्वाती राऊत आहेत सातारकर साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर संदीप श्रोत्री,शिरीष चिटणीस ,विनोद कुलकर्णी श्रीराम नानल यांनी केले आहे

