संस्कारभारतीतर्फे भरत मुनी स्मरण दिन


रविवार दिनांक 16 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन
सातारा
नाट्यशास्त्राचे जनक भरत मुनी यांचा स्मरण दिन दरवर्षी माघ शुक्ल पौर्णिमेला साजरा केला जातो यानिमित्ताने संस्कार भारती सातारा जिल्हा समितीतर्फे रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी विविध कलाविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सातारा येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या गणेश सभागृहामध्ये सायंकाळी पाच वाजता हे कार्यक्रम होणार आहेत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कायदेशीर सल्लागार ऍड सुधीर गोवेकर आणि सामाजिक कार्यकर्ते विकास गोसावी उपस्थित राहणार आहेत
सातारा जिल्हा संस्कार भारती समितीचे प्रसिद्धीप्रमुख मुकुंद फडके हे भरत मुनीचे नाट्यशास्त्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तसेच वैभव फडतरे नांदी आणि नाट्यगीत सादर करणार आहेत रसिक कला मंच या संस्थेचे बालकलाकार नाट्य अभिवाचन करतील तर सौ वर्षा साबडे या एकपात्री अभिनय सादर करणार आहेत डॉक्टर सुनील देशपांडे नाट्य अभिवाचन करणार असून भानुदास गायकवाड लोकगीताचे सादरीकरण करणार आहेत नेहा घाडगे आणि त्यांच्या सहकारी नृत्यकला सादर करणार आहेत तर कल्याणी गायकवाड या भैरवी सादर करणार आहेत सातारकर कलाप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्कार भारती सातारा जिल्हा समितीचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर आणि सचिव प्रदीप इनामदार यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!