अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून करायचे वसुली
सचिन वाझेचे खळबळजनक आरोप
मुंबई
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या पीएच्या माध्यमातून पैसे घेऊन वसुली करायचे असा खळबळजनक आरोप मुंबईचे बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केले आहेत
महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघेल अशी ही खळबळजनक बातमी असून मुंबईचे बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी पुन्हा एकदा हा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे सचिन वाझेंने अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले आहेत. देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे असल्याची माहिती सचिन वाझेने दिले आहेत. देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असे आरोप वाझेने केले आहेत.
जे काही घडले, त्याचे पुरावे आहेत. पैसे त्यांच्या (अनिल देशमुख) पीएमार्फत गेले. याचे सीबीआयकडे पुरावे आहेत आणि मी एक लेखी माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी सर्व पुरावे सादर केले आहेत.सचिन वाझे हे 2021 च्या अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातही आरोपी आहेत.
