रंगभूमी दिनानिमित्त विविध कार्यक्रम


दीपलक्ष्मी पतसंस्था आणि नाट्य परिषदेतर्फे आयोजन
सातारा
येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची सातारा शाखा आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या पुढाकाराने नाट्यवेड्या मराठी रसिकांसाठी मंगळवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
येथील दीपलक्ष्मी सभागृहात संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सातारमधील हरहुन्नरी नाट्यकर्मी स्नेहा धडवई, रवीना गोगावले,अंकिता दणाणे आणि देवदत्त घोणे हे कलाकार एकपात्री अभिनयाचे सादरीकरण करणार आहेत यातील तीनही अभिनेत्रींनी अभिनयाचे राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार पटकावले आहेत. कार्यक्रमात समाविष्ट केलेले एकपात्री प्रयोगही पुरस्कारप्राप्त आहेत. देवदत्त घोणे हा बालकलाकार असून, “महाराष्ट्र शाहीर” चित्रपटात लहानपणीच्या शाहीर साबळे यांची भूमिका त्याने साकारली आहे.

Advertisement

 


या कार्यक्रमात डॉक्टर निलेश माने आणि धैर्या विनोद कुलकर्णी यांचा सत्कारही करण्यात येणार आहे डॉक्टर निलेश माने यांनी लिहिलेल्या लेबल या एकांकिकेला नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनामध्ये पुरस्कार मिळाला आहे त्यानिमित्ताने डॉक्टर निलेश माने यांचा सत्कार करण्यात येणार असून धैर्या विनोद कुलकर्णी हिने आफ्रिका खंडात भारताचा झेंडा फडकवून किलिमांजरो शिखर सर केल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात येणार आहे
या कार्यक्रमाला सातारकर रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस,ज्येष्ठ लेखक संपादक मुकुंद फडके आणि रंगकर्मी पत्रकार राजू मुळे यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!