शिरीष महाराजांचे कर्ज एकनाथ शिंदेंनी फेडले


पुणे
आर्थिक विवंचनेतून शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली अन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचं ओझं कमी केलं आहे. संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण करणाऱ्या शिरीष महाराजांसाठी एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचललं आहे. आमदार विजय शिवतारेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना शिंदेंनी पाठवलेली 32 लाखांची रक्कम देऊ केली.

Advertisement

देहूतील राहत्या घरी 5 फेब्रुवारीला शिरीष महाराजांनी गळफास घेत आत्महत्या केली आणि वारकरी संप्रदयात शोककळा पसरली. ही बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समजली आणि त्यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं. ज्या कारणाने महाराजांनी आत्महत्या केली, ते कर्जाचं ओझं आज स्वतः उपमुख्यमंत्री शिंदेंनी उतरवलं.
संत तुकाराम महाराजांचे 11 वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना घडली. डोक्यावर असलेल्या 32 लाखांच्या कर्जामुळे हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये शिरीष महाराज मोरे यांनी नमूद केलं होतं. या घटनेच्या आधी, 20 दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. मात्र त्यांच्या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना मोठा धक्का बसला.
शिरीष महाराज मोरेंनी जगाचा निरोप घेताना, आपल्या मागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं असं म्हणत कोणावर अन्याय होणार नाही, याची दक्षताही घेतली. मात्र त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असं म्हणत चुकीची चर्चा घडवण्यात येत असल्याचं मोरे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!