देवेंद्र फडणवीस राज ठाकरे भेट


शिवतीर्थावरील भेटीनंतर चर्चेला उधाण
मुंबई
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या दोन दिग्गज नेत्यांच्या अचानक भेटीमुळे अनेक चर्चेला उधाण आले आहे.
आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता. त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की, मी घरी येईल. त्यानुसार आज मी त्यांच्या घरी गेलो होतो असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या घरी ब्रेकफास्ट केला, त्यांच्याशी गप्पा मारल्याचे फडणवीस म्हणाले. या भेटीचा कोणताही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होतो असेही फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता त्यांची भेट घ्यावी आणि त्यांच्याशी गप्पा मारावे असे अनेकांना वाटतं, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असतील अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी दिली. दोन राजकीय नेते भेटल्यावर सहाजिक राजकीय गोष्टींवर चर्चा होणार. राज ठाकरेंना आगामी निवडणुकीसाठी सोबत घेण्याबाबत देखील ही भेट असू शकते, असे मत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. यावर बोलतांना भाजप नेते प्रसाद लाड यांनी आपली प्रतिक्रिया देत ही भेट मैत्रीपूर्ण भेट असल्याची माहिती दिली आहे. राजकीय नेते भेटल्यावर राजकीय चर्चा स्वाभाविक होणारच, यात दुमत नाही,असेही प्रसाद लाड म्हणाले.
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे एक कॅफे उघडला होता एवढेच मला माहिती आहे. तिथे काही लोक सातत्याने चहापाण्यासाठी जात असतात आणि तो सर्वासाठी खुला आहे. किंबहुना राजकारणातली ही चांगली गोष्ट असून असे चहापान होत असतात. चांगला कॅफे असला तर लोक जात येत असतात त्यांना चांगला नजारा बघायला मिळतो, बसायला उत्तम जागा मिळते, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून संजय राऊत यांनी भाष्य करत ही टीका केली आहे.
तर दुसरीकडे राज ठाकरे यांचा राजकीय वावर संपत चाललाय. अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!