बुधवारी केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण
अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांचा सहभाग
सातारा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंग महाराज थोरले नगर वाचनालय सातारा आणि आयसीएआय सातारा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे एनएसडीएलचे निवृत्त कार्यकारी उपाध्यक्ष अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यावेळी केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण करणार आहेत
बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजता पाठक हॉल येथे हा कार्यक्रम होणार असून सातारकर नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अजित कुबेर विश्वस्त समितीचे अध्यक्ष अनंत जोशी आणि आयसीएआय सातारा शाखा सीए सौरभ लाहोटी यांनी केले आहे

