मतपत्रिकेद्वारे निवडणुकीस सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट नकार
याचिकाकर्त्याला सुनावले खडे बोल
नवी दिल्ली
विधानसभा निवडणुकानंतर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.याबाबत याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला सुप्रीम कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत
राज्यातील विधानसबभा निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीचे नेते पराभवाचं चिंतन करत आहेत.पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त होत आहे.राज्यातील निकालानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित झाल्याने, ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तसेच, याचिकाकर्त्यांना खडे बोलही सुनावले आहेत.
विधानसभा निवडणुकानंतर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. तसेच, जिंकलं की तुम्हाला ईव्हीएम चांगले वाटतात आणि निवडणूक हरलं की तुम्हाला ईव्हीएममध्ये छेडछाड दिसते, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना झापलं आहे. डॉ. के.ए. पॉल यांनी ही याचिका केल होती. मात्र, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे, ईव्हीएमच्या घोळावरुन संशय व्यक्त केला जात असल्याच्या आरोपांना आता काहीही अर्थ उरला नाही.

