लतादीदींना संगीतातून आदरांजली


दीपलक्ष्मी पतसंस्था आणि सुहाना सफर ग्रुपचा उपक्रम
सातारा
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व सुहाना सफर ग्रुप यांच्या विद्यमाने संगीत की देवी हमारी लता हा कार्यक्रम सादर करण्यात येऊन संगीताच्या माध्यमातून लतादीदींना आदरांजली वाहण्यात आली
दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्याम बडवे अविनाश कदम अनिल वाळींबे हेमंत कासार विजय साबळे शिरीष चिटणीस आणि मुकुंद फडके उपस्थित होते
विजय साबळे यांच्या संकल्पनेतून आणि संयोजनातून तयार झालेल्या या कार्यक्रमामध्ये स्वतः विजय साबळे डॉक्टर सुनील पटवर्धन डॉक्टर लियाकत शेख सचिन शेरकर मंजुषा पोतनीस सुषमा बगाडे वनिता कुंभार मंजिरी दीक्षित ममता नरहरी सीमा रजपूत आणि दिपाली घाडगे यांनी लतादीदींची विविध गाणी सादर करून रसिकांना तृप्त केले
यावेळी बोलताना मुकुंद फडके यांनी लता मंगेशकर यांच्या काही आठवणींना उजाळा दिला अविनाश कदम यांनी या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे ताण-तणाव निघून गेल्याचे आवर्जून सांगितले डॉक्टर श्याम बडवे यांनीही आपल्या भाषणामध्ये आयुष्यातील कलेचे महत्त्व स्पष्ट केले हेमंत कासार यांनी असे कार्यक्रम वारंवार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड सपना डफळे यांनी केले
ध्वनीव्यवस्था सचिन शेवडे यांची होती

Advertisement

फोटो ओळ
दीप प्रज्वलन करताना विजय साबळे,शेजारी डॉ सुनील पटवर्धन,मुकुंद फडके,हेमंत कासार,डॉ श्याम बडवे,अविनाश कदम,अनिल वाळिंबे,शिरीष चिटणीस


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!