राहुल गांधींची ही ‘कव्हर फायरिंग


मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘मतदार यादी’च्या आरोपावरुन टीका

Advertisement

नागपूर : महाराष्ट्रात किती मतदार आणि कुठे वाढले हे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. दिल्लीमध्ये मोठा पराभव होणार असल्याने राहुल गांधी कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत,अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे
राहुल गांधी याना माहित आहे दिल्लीत त्यांचा सुपडासाफ होणार आहे, म्हणून त्यांनी ही तयारी सुरु केली आहेयासाठीही फडणवीस यांनी म्हटले आहे .
राहुल गांधींनी महाविकास आघाडीतील खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर आकडेवारी सादर करत निवडणूकीत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस पुढे म्हणाले, मी वारंवार सांगतो, जोपर्यंत गांधी आत्मचिंतन करणार नाहीत आणि आपल्या मनाची समजूत काढून घेतील, तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाहीत. त्यांचा पक्ष देखील पुन्हा तग धरु शकणार नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!