कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या स्पर्धांना महिलांचा प्रतिसाद
सातारा
कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या सातारा शाखेच्यावतीने नुकत्याच झालेल्या संक्रांत संमेलनाच्या कार्यक्रमात महिलांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकारिणी सदस्या सौ. विजयालक्ष्मी फणसळकर, सौ. प्राची शहाणे व सदस्या सौ. मानसी मोघे, सौ. अजया करंबेळकर यांनी या कार्यक्रमातील स्पर्धांचे नियोजन अत्यंत मनोरंजनात्मक केल्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. स्त्रियांसह उपस्थितांना कार्यक्रमांत सहभाग घेता येऊन आनंद लुटता आला. या कार्यक्रमात सौ. शुभदा शेंबेकर यांचीही मोलाची साथ लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मानसी मोघे यांनी खुमासदार शैलीत केले. सौ. प्राची शहाणे यांनी प्रास्ताविकात संघाने घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सौ. विजयालक्ष्मी फणसळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष अनिलराव काटदरे, उपाध्यक्ष बाळासाहेब भाटे, सदस्य विलास शेंबेकर, सौ. उत्तरा पराडकर आदींची उपस्थिती होती.

