‘कांचनगंगेच्या कुशीत’  पुस्तकाचे प्रकाशन


पुस्तकात डॉ. श्रोत्री यांच्या सृजनशीलतेचे दर्शन:डॉ पराग काळकर
पुणे,

सातारा येथील प्रसिद्ध गिर्यारोहक डॉ. संदीप श्रोत्री लिखित ‘कांचन गंगेच्या कुशीत’ या पुस्तकाचे प्रकाशन एका देखण्या समारंभात संपन्न झाले . पुण्यातील प्रसिद्ध गिर्यारोहण संस्था गिरिप्रेमी आणि आम्ही पुस्तक प्रेमी समूह या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. प्रसाद काळकर व गिरिप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक श्री. उमेश झिरपे व हिमालयन क्लब पुणेचे मानद सचिव डॉ. रघुनाथ गोडबोले यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ निसर्गप्रेमी प्र. के. घाणेकर, मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, गिरिप्रेमी संस्थेचे अध्यक्ष जयंत तुळपुळे, हेडविग मीडिया हाऊस मुंबईचे संचालक चैतन्य पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
कांचनजुंगा या जगातील तिसऱ्या सर्वात उंच तर भारतातील सर्वात उंच पर्वताच्या बेस कॅम्प पर्यंतचे अतिशय विलोभनीय वर्णन वाचकांना या पुस्तकातून वाचता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ पराग काळकर यांनी “एक सर्जन असलेले डॉ. श्रोत्री यांच्या सृजनशीलतेचे दर्शन या पुस्तकातून घडते. हिमालयामध्ये ट्रेकिंग करताना फक्त तो फक्त ट्रेक न करता आजुबाजूचा भवताल त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने टिपला आहे.” या भावना आपले मनोगत व्यक्त करताना मांडल्या.
श्री. उमेश झिरपे यांनी गिरिप्रेमीच्या २०१९ साली यशस्वी झालेल्या कांचनजुंगा मोहिमेतील आठवणींना उजाळा दिल्या. “डॉ. संदीप श्रोत्री यांनी या मोहिमेच्या वेळी बेसकॅम्प पर्यंतचा ट्रेक करून अनेक निरीक्षणे केली व ती या पुस्तकातून वाचकांपर्यंत पोहचवत आहेत. आजकाल वाढणाऱ्या गिर्यारोहण या जीवनशैलीमध्ये अशा प्रकारची पुस्तके प्रकाशित होणे अत्यंत आवश्यक आहे. या शिखरावर चढाई करण्यासाठी किंवा या शिखराच्या बेसकॅम्प पर्यंत अनेक गिर्यारोहक जात असतात. त्यांच्या साठी हे पुस्तक खूप फायदेशीर ठरेल.” अशा भावना श्री. झिरपे यांनी व्यक्त केल्या. इतर उपस्थित मान्यवरांनीही या पुस्तक प्रकाशनास शुभेच्छा दिल्या.
पुस्तक प्रकाशनंतर कांचनजुंगा शिखरावर यशस्वी चढाई केलेल्या भूषण हर्षे, विवेक शिवदे, जितेंद्र गवारे, किरण साळस्तेकर, भगवान चावले या गिर्यारोहकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्र संचालक सौ. अपर्णा जोग यांनी केले व डॉ. स्वाती श्रोत्री यांनी उपस्थितांचे आभार मानले

Advertisement

फोटो ओळ

डावीकडून सौ.स्वाती श्रोत्री, शिरीष चिटणीस, प्र के घाणेकर, डॉ. रघुनाथ गोडबोले, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. पराग काळकर, उमेश झिरपे, विनोद कुलकर्णी, जयंत तुळपुळे, चैतन्य पंडित.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!