करुणा शर्मा याना देखभाल रक्कम मिळणार


वांद्रे कुटुंब न्यायालयाचा आदेश

Advertisement

मुंबई
महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा याना देखभाल रक्कम द्यावी असा आदेश वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं दिला आहे.
वांद्रे फॅमिली कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
करुणा शर्मा वांद्रे फॅमिली कोर्टाच्या निर्णयानंतर म्हणाल्या , कोर्टातून मला न्याय मिळाला, न्यायालय आणि न्यायाधीशांचे आभार मानते. मुलं सोबत असल्यानं तिघांना प्रत्येकी 5 लाख मिळतील अशी मागणी होती. मला दोन लाख मिळाले आहेत. आता मी हायकोर्टात जाणार आहे गेली तीन वर्ष पोटगीसाठी लढत आहे, किती त्रास झाला हे सांगू शकत नाही मंत्र्यासोबत माझी लढाई होती. माझ्या वकिलानं एक रुपया न घेत हा खटला कोर्टात दाखल केला. आज आमचा विजय झाला आहे. हा सत्याचा विजय आहे, जशी जीवनशैली आहे त्याप्रमाणं पोटगी मिळावी अशी अपेक्षा होती ती मिळावी यासाठी आता लढणार आहे
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय, “करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.”
कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नाही
करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील व्यक्तिगत कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी न्यायालयाने कोणताही कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नाही मीडियाने जबाबदारीने आणि अचूक वृत्तांकन करावे असे आवाहन धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी केले आहे
आजचा आदेश फक्त अंतिम देखभालीसाठी रक्कम देणेबाबत इतकाच आहे जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे. कथित हिंसाचाराच्या कोणत्याही आरोपावर आधारित नाही.धनंजय मुंडे यांनी स्वतः ते शर्मा व मुले यांच्याबरोबर लिव इनमध्ये असल्याबाबतची यापूर्वीच कबुली दिली आहे तोच या आदेशाचा आधार आहेअसे त्यांनी म्हटले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!