वार्षिक राशिभविष्य 2025:तूळ


वार्षिक राशिभविष्य 2025
2025 च्या पोटात काय दडले असेल याची उत्सुकता सगळ्यांना असेल पुढील वर्षी शनी महाराज 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यामुळे मकर राशीची साडेसाती संपत असून मेष राशीची साडेसाती सुरू होईल 14 मे 2025 रोजी गुरुचा मिथुन राशीत प्रवेश होईल तसेच 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू यांचाही राशी बदल होईल राहू मीनेतून कुंभ राशीत प्रवेश करेल तर केतू कन्येतून सिंह राशीत प्रवेश करील वार्षिक भविष्य पाहताना वरील मुख्य ग्रहांचे राशी बदल आणि इतर सर्व ग्रहांचे गोचर पाहून राशिफल तयार होते

Advertisement

तूळ
नवीन वर्ष संमिश्र फळ देणार
तूळ राशीच्या व्यक्तींना 2025 हे नवीन वर्ष संमिश्र फळ घेऊन येणार आहे पण तरीही काही बाबतीत तूळ राशीच्या लोकांना हे वर्ष खूप चांगले जाईल यावर्षी नवीन घर निर्माण करून त्यात गृहप्रवेश करण्याचे योग येतील कुटुंबात जर काही कोटके चालू असतील तर त्याही संपतील वैवाहिक जीवनात काही अडचणी गैरसमज असतील तर ते दूर होतील आणि संबंध चांगले होतील मुलांना नोकरीत प्रमोशन मिळेल त्यांच्याकडून तुमचा मान सन्मान केला जाईल तूळ राशीचे कलाकार लेखक कवी यांना त्यांच्या क्षेत्रात लाभ आणि प्रसिद्धी मिळेल नवीन कामे मिळतील ज्या व्यक्तींचा खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे अशा व्यक्तींना भरपूर काम मिळून त्यांची प्रगती होईल हॉटेल इंडस्ट्रीशी संबंधित जे लोक असतील त्यांनाही काम वाढल्यामुळे भरपूर आर्थिक लाभ होतील कुटुंबातील ज्येष्ठांची आणि भावंडांची मदत होईल मित्रांचीही तुम्हाला मदत मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्यानंतर यश मिळेल प्रेम संबंध सुधारतील आणि कदाचित ते वैवाहिक संबंधात रूपांतरित होतील जानेवारी फेब्रुवारी महिन्यात वडिलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे न्यूरो प्रॉब्लेम किंवा हृदयरोग सारखे आजार होण्याची शक्यता आहे सावध राहा आणि लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या 29 मार्च 2025 रोजी शनीचे गोचर मीन राशीत होईल शनि तुमच्या राशीच्या सहाव्या स्थानातून गोचर करीत आहे हे गोचर तुमच्या राशीसाठी उत्तम असेल अनेक प्रकारे धनलाभ होतील कुटुंबात सुख समृद्धी येईल कुटुंबातील सदस्य एकमेकांना मदत करतील विवाहित दांपत्य ज्यांना अपत्य प्राप्तीची इच्छा आहे त्यांची इच्छा यावर्षी पूर्ण होईल शत्रू तुमच्यासमोर टिकणार नाहीत शनीचे गोचर मुळे तुमचे घराचे स्वप्नही पूर्ण होईल 14 मे 2025 रोजी गुरुचे गोचर वृषभ राशीतून मिथुन राशीत होईल आतापर्यंत अष्टमस्थानी असलेल्या गुरुमुळे तुम्हाला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले आहे परंतु आता गुरु तुमच्या भाग्यस्थानात येणार आहेत तुमच्या सगळ्या अडचणी आणि परिस्थिती बदलणार आहे अविवाहित मुला मुलींची लग्न होतील काहीजण प्रेमविवाह करणार असतील तर गुरु त्यांची इच्छा पूर्ण करतील नवीन घरात गृहप्रवेश कराल यावर्षी अनेक तरुणांना सरकारी शिक्षकाची नोकरी मिळेल 30 मे रोजी राहू आणि केतूचे गोचर कुंभ आणि सिंह राशीतून होणार आहे म्हणजेच राहूचे पंचम स्थानातून आणि केतूचे लाभस्थानातून भ्रमण होणार आहे ज्या विवाहित जोडप्यांना संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा म्हणजे संतती प्राप्त होऊ शकेल जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी अभ्यासात कोणताही आळस करू नये नाहीतर मनाजोगे यश मिळणार नाही तूळ राशीसाठी फेब्रुवारी जून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने आव्हानात्मक राहतील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!