सातारा नगर वाचनालयातर्फे ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार


सातारा:
१७१ वर्षांची सांस्कृतिक परंपरा असलेल्या आणि सातारचे सांस्कृतिक केंद्र अशी ओळख असलेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या वतीने जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान करणेत आला.
३ ऑक्टोबर २०२४ रोजी माय मराठीला सर्व निकषांची पूर्तता करून, अथक पाठपुराव्यानंतर पाली ,प्राकृत, असामी व बंगाली या भाषा भगिनींसह अभिजात दर्जा जाहीर करण्यात आला. धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक अशी प्राचीन परंपरा असलेल्या मराठी भाषेला या सन्मानाप्रत नेण्यात साहित्यिक, लेखक,कवी, नाटककार ,समीक्षक, पत्रकार, वक्ते,साहित्य चळवळीतील कार्यकर्ते व प्रत्येक भाषाप्रेमीचे कार्यकर्तृत्व महत्वपूर्ण आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ साहित्यिकानी आपल्या लेखणी व वाणी द्वारे माय मराठीसाठी दिलेले योगदान अत्यंत स्पृहणीय आणि अभिमानास्पद आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणेसाठी या उपक्रमांतर्गत श्री. म वि कोल्हटकर, श्री.संभाजीराव पाटणे, श्री.अरुणराव गोडबोले श्री. दत्तप्रसाद दाभोळकर, श्री. श्रीनिवास कुलकर्णी श्री.जयवंत गुजर,श्री. विश्वास दांडेकर श्री. रमणलाल शहा,श्री. डी व्ही देशपांडे श्री. पुरुषोत्तम शेठ,श्री. रविंद्र बेडकीहाळ यांना सन्मानपत्र ,शाल,पुष्पगुच्छ व सातारी कंदी पेढे देऊन संचालक मंडळातील सदस्यांच्या उपस्थितीत सत्कार करणेत आला. या अभिनव उपक्रमाबद्दल या सर्वच ज्येष्ठ साहित्यिकानी नगर वाचनालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले तसेच आनंद व्यक्त केला. या उपक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचाही सन्मान करणेचे नियोजन होते. तथापि त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सत्कार स्वीकारू शकत नसल्याचे कळविले..

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!