बचत गट महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम


भाजप जिल्हा महामंत्री मनीषा ताई पांडे यांचा उपक्रम

Advertisement

सातारा
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा महामंत्री मनीषा ताई पांडे यांनी सदर बाजार येथील लक्ष्मी टेकडीच्या महिला बचत गटांच्या महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमात महिलांसाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती व भाजपा सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमास नगरपरिषदेच्या अंत्योदय योजना प्रमुख कीर्तीताई साळुंखे जोशी मॅडम सर्व सी. आर. पी. ,राजधानी बचत गट जिल्हास्तर अध्यक्ष आशाताई मुळीक, सचिव सुवर्णा कडगोळ महिला मोर्चा जिल्हा चिटणीस नंदाताई इंगवले शहर अध्यक्ष रीनाताई भणगे नयना ताई कांबळे व बचत गटातील जवळपास 100 ते 150 महिला उपस्थित होत्या. यावेळेस सर्व महिलांसाठी तिळगुळ वाण व नाश्त्याचे नियोजन करण्यात आले होते.आलेल्या प्रत्येक महिलेने आथिर्क दृष्टीने सक्षम होण्याचा वसा आज घेऊन जावा अशी अपेक्षा सौ.मनीषा ताई पांडे यांनी व्यक्त केली.तसेच किर्तीताई साळुंखे यांनीही बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले व महिलांसाठी पुढील अनेक कार्यक्रमांचे नियोजनही करण्यात आले.
मनीषाताई पांडे नेहमीच आपले सण, परंपरा साजरे करतांना सामाजिक उपक्रम राबवता येतील आणि समाजातील अंतिम घटकापर्यंत पोचता येईल असे उद्दिष्ट ठेवून सण साजरे करण्याचा प्रयत्न त्या करत असतात गेल्या वर्षी त्यांनी अंगणवाडीतील 70 मुलांच्या बोर न्हाणाचा कार्यक्रम घेतला होता


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!