गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे मोठे यश
विषेश कार्यकारी अधिकारी म्हणून शासनाचे प्रमाणपत्र प्रदान
सातारा
येथील कामगार क्षेत्रात गेली 30 वर्षे सतत कार्यरत असणाऱ्या गुणवंत कामगार प्रतीष्ठानच्या संजय पवार,संजय गिरी,प्रजय राऊत,चंद्रकांत लोहार,विठ्ठल तांबे (गोदरेज,लॉकीम,शिंदेवाडी,शिरवळ) महेंद्र धनवे(गरवारे वोल रोप वाई) आनंदा पाटील(इमर्सन कराड) या सभासदांना जिल्हाधिकारी संतोष पाटील ह्यांचे हस्ते,”विषेश कार्यकारी अधिकारी”म्हणून शासनाचे प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले!हे सर्व कर्मचारी शासनन्मान्य,”गुणवन्त कामगार पुरस्कार “विजेते आहेत.ह्या सर्व कामगारांना त्यांच्या वयाच्या 65 वर्षा पर्यंत आपले हे नूतन कार्य करता येणार आहे,
ह्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार श्री वैभव पिलारे साहेब व सर्वश्री नितीन मतकर व दीपक गुरव महसूल सहाययक हे आवर्जून उपस्थित होते.सदरहू कार्यक्रमास गुणवन्त कामगार प्रतिष्ठानचे संस्थापक श्री दिलीपराव चरेगावकर व श्री गोपाळराव खजुरे ह्यांची विशेष उपस्थिती होती!
कार्यक्रमास प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष व राज्य गुणवन्त कामगार असो,चे जिल्हाध्यक्ष श्री अशोकराव जाधव खास निमंत्रित होते!प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जयंत देशपांडे ह्यांच्या समवेत कार्यक्रम झाला!
ह्यावेळी श्री अशोकराव जाधव ह्यांचे हस्ते तहसीलदार साहेब श्री पिलारे ह्यांचा तर मा.पिलारे साहेब ह्यांचे हस्ते सर्वश्री दिलीपराव चरेगावकर व गोपाळराव खजुरे तसेच श्री मतकर व दीपक गुरव ह्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री अशोकराव जाधव,गोपाळराव खजुरे ह्यांनी नूतन विशेष कार्यकारी अधिकारी गुणवंतांचे अभिनंदन केले!श्री दिलीपराव चरेगावकर ह्यांनी नूतन अधिकाऱयांना त्यांच्या कार्याची प्रणाली,शासन नियम व कार्य व्याप्ती विशद केली!
ह्या सर्व कार्यास श्री अशोकराव जाधव व माजी अध्यक्ष श्री गजानन घाडगे ह्यांचे अथक परिश्रम कारणीभूत ठरले!
ह्याबद्दल श्री चरेगावकर ह्यांचे हस्ते श्री अशोकराव जाधव ह्यांचा खास सत्कार करण्यात आला!
पश्चिम महाराष्ट्र मध्ये अशा प्रकारे एकाच वेळी सात कामगारांना शासनाने,”विशेष कार्यकारी अधिकारी” म्हणून पहिल्यांदाच गौरवून प्रतिष्ठानचे कार्याचा सन्मान केला आहे,
प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकारिणीने,सभासदांनी,संबंधीत कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱयांनी प्रतिष्ठानच्या व ह्या गुणी नूतन विशेष कार्यकारी अधिकारी कर्मचाऱयांचे अभिनंदन केले आहे.

