गुरुवारपासून माय मराठी चित्रपट महोत्सव
अनुभव फिल्म क्लबतर्फे साताऱ्यात उपक्रम
सातारा
सातारकर चित्रपट रसिकांसाठी सुंदर चित्रपटांची मेजवानी ‘अनुभव फिल्म क्लब’ द्वारे करण्यात आली आहे.मनोरंजनातून समाज प्रबोधन चित्रपट माध्यमाद्वारे २७ वर्षे सातत्याने करणारी चित्रपट रसिकांची कलात्मक चळवळअनुभव फिल्म क्लब’तर्फे ‘माय मराठी महोत्सव’ गुरुवार दि. २३ जानेवारी ते रविवार २६ जानेवारी २०२५ दरम्यान ‘सेवन स्टार चित्रपटगृह, सातारा’ येथे दररोज सकाळी ९.३० वा. आयोजित करण्यात आला आहे.
वर्षभर जागतिक दर्जाचे उत्तमोत्तम विदेशी चित्रपट दाखवतानाच मराठी चित्रपट सृष्टीतील काही नजरेतून सुटलेले वेगळेपण जपणारे चित्रपटांना रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे तसेच दिग्दर्शक कलावंतांचा रसिकांशी भेट घडवून आणण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे
यावेळी समर्थ रामदास स्वामींचे जीवन चरित्र असलेला ‘रघुवीर’ चित्रपट गुरुवारी , एका मध्यमवर्गीय कुटुंबाची स्वप्न कैद करुन ठेवणारा ‘कुलूप’ शुक्रवारी कोकणातल्या ज्या खेडेगावात साक्षात हुकूमशहा हिटलर अचानक अवतरला ते ‘मु. पो. बोंबिलवाडी’ शनिवारी आणि नातवाच्या हरवलेल्या कुत्र्याचा शोध घेणारी प्रथितयश लेखिके(शर्मिला टागोर)ची हलकी फुलकी कहाणी असलेला ‘आऊट हाऊस’ रविवारी असे चार चित्रपट रसिकांना पहावयास मिळतील.. सोबत ‘आऊट हाऊस’ चे निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे याच्यांशी रसिकांना थेट सुसंवाद साधता येणार आहे..
तरी सातारकर चित्रपट रसिकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी दीपलक्ष्मी पतसंस्था, सातारा अथवा राजभूषण सहस्रबुद्धे (९८२२२०६०२६) यांच्याशी संपर्क साधावा.

