संस्कार भारतीची संग्राह्य दैनंदिनी श्रीमंत योगी


दैनंदिनीच्या पानापानात शिवछत्रपतींचा इतिहास

Advertisement

पुणे
कला – साहित्य क्षेत्रात कार्यरत असणारी संस्कार भारती ही आखिल भारतीय संस्था सातत्याने नवीन काहीतरी करत असते संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताच्या वतीने सन २००८ पासून प्रतिवर्षी संग्राह्य व नाविन्यपूर्ण विषयावरील दैनंदिनी म्हणजेच डायरी प्रकाशित केली जाते.यावर्षी छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाच्या ३५०व्या वर्षा निमित्त ‘श्रीमंतयोगी’ ही विशेष दैनंदिनी उपलब्ध करून दिली आहे १५ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते प्रवीण तरडे यांच्या हस्ते या दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले.संस्कार भारतीची श्रीमंत योगी ही दैनंदिनी आगळी आणि संग्राह्य असून दैनंदिनीच्या पानापानात शिवछत्रपतींचा इतिहास उलगडला आहे
छत्रपति शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. मुघल सत्तेशी लढा देत शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. दि. ६ जून १६७४ या वर्षी राजधानी रायगड येथे शिवाजी महाराजांचा राजाभिषेक संपन्न झाला. हा क्षण हिन्दूंच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. या शिवराजाभिषेकाला ३५० वर्षे झाली.
ख्यातनाम मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. गो. वं. देगलूरकर व इतिहासाचे अभ्यासक श्री. प्र. के. घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्रीमंतयोगी’ ही दैनंदिनी प्रकाशित केली आहे. या दैनंदिनीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्या तारखेला किंवा तिथीला महाराज कोणत्या गडावर अथवा मोहिमेवर होते याची माहिती त्या त्या पानावर वाचावयास मिळते.दैनंदिनीच्या सुरुवातीला व शेवटी ख्यातनाम चित्रकार व संस्कार भारतीचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष मा.वासुदेव कामत यांनी रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाचे व त्या नंतर निघालेल्या मिरवणुकीचे चित्र मुख्य आकर्षण आहे.तसेच शिवाजी महाराजांनी ज्या सेनापतींच्या सहकार्याने व समर्पणाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या मावळ्यांचे प्रसंग चित्रासह माहिती प्रत्येक महिन्याच्या शेवटी देण्यात आली आहे.
ही संग्राह्य अशी दैनंदिनी प्रत्येकाच्या घरी नव्हे तर देवघरात असावी अशी आहे. जाणत्या कलासाधकांनी आणि शिवप्रेमींनी संस्कार भरतीच्या स्थानिक कला साधकांशी संपर्क साधून ही दैनंदिनी आपल्या संग्रही ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे
संस्कार भारतीने आपल्या दैनंदिनीचे वेगळेपण जपल्याने दरवर्षी डायरी प्रकाशनाची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली असते.आजपर्यंत दिपत्कार, कलायात्री, विवेकामृत, दुर्गवंदन, संत संस्कार, वाद्यपंढरी, नृत्यसाधना, उद्गार, अमृतसरिता, बृहत्तर भारत अशा विविध विषयावरील दैनंदिनी प्रकाशित झाल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!