नव्वदच्या दशकातील गाण्यांचा शनिवारी कार्यक्रम


दीपलक्ष्मी पतसंस्था व म्युझिकल कट्टातर्फे आयोजन

Advertisement

सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व म्युझिकल कट्टा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नाईन्टीज फ्लॅशबॅक हा 1990 च्या दशकातील सुमधुर गाण्यांवर आधारित कार्यक्रम शनिवार दिनांक 24 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे होणार आहे .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शाम बडवे, सुरेखा शेजवळ, मुकुंद फडके, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत.
मेघा पंडित,माणिक कांबळे, अश्विनी कांबळे आणि सतीश पाटील हे गायक कलाकार 90 च्या दशकातील गाजलेली सुमधुर गाणी सादर करणार आहेत.या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!