नगर वाचनालयात दुर्मिळ ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
शासनाच्या वाचन संकल्प पंधरावडानिमित्त उपक्रम
सातारा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा येथे शासनाच्या वाचन संकल्प पंधरावडा निमित्त ग्रंथ प्रदर्शन उपक्रमामध्ये बुधवारी दिनांक 15 जानेवारी रोजी दुर्मिळ ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले .ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके आणि प्राध्यापक संजीव बोंडे यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले
यावेळी मुकुंद फडके म्हणाले,कागदाच्या पुस्तकांना मर्यादित आयुष्य असल्याने अशा दुर्मिळ जुन्या ग्रंथांचे डिजिटायझेशन करून हा ठेवा जपला पाहिजे.आधुनिक पद्धतीने जतन केलेले साहित्य चिरंतन राहील
या ग्रंथालयात अनेक दुर्मिळ ग्रंथ आहेत मी लहान असताना या ग्रंथालयात वेगवेगळ्या प्रकारचे विपुल वाचन केले आहे आज याच वाचनालयात दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शनाचे उद्घाटन करताना येथे काम करणाऱ्या माणसांच्याही बऱ्याच आठवणी माझ्या मनात आहेत. या वाचनामुळे माझी जडणघडण झाली आहे.असेही त्यानी सांगितले
प्राध्यापक संजीव बोंडे म्हणाले ,या ग्रंथालयातल्या दुर्मिळ पुस्तकांचे संगोपन डिजिटलच्या माध्यमातून केले जात आहे ही अतिशय स्तुत्य बाब आहे जवळपास सव्वाशे ग्रंथांचे डिजिटलायझेशन झाले आहे .त्यामुळे हे ग्रंथ दीर्घकाळ संग्रहित राहणार आहेत .
नगर वाचनाचे अध्यक्ष अजित कुबेर यांनी दुर्मिळ ग्रंथ संग्रहित करण्याचा मानस नगर वाचनालयाने केला आहे असे सांगितले
साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने म्हणाले या ग्रंथालयातले कर्मचारी यांनी सुद्धा वाचक निर्माण करण्याचं काम केलं आहे मुकुंद फडके यांच्या आठवणीतून आलेले नगर वाचनालयाचे जुने कर्मचारी हे सुद्धा सामान्यातले असामान्य होते .
कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी सर्वांचे आभार मानले
यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष अजित कुबेर विश्वस्त समितीचे अध्यक्ष अनंतराव जोशी नगर वाचनालयाचे कर्मचारी रूपाली मुळे अन्वेषा कलेढोणकर विष्णू धावडे वेदांत कारवे विजय दळवी वगैरेउपस्थित होते

