रवींद्र इनामदार यांच्या संहितेला प्रथम क्रमांक


हिरण्यगर्भ, मिरज आयोजित ‘दोन अंकी दोन पात्री नाट्यलेखन स्पर्धे’चा निकाल जाहीर
सातारा
हिरण्यगर्भ, मिरज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दोन अंकी दोन पात्री नाट्यलेखन स्पर्धे’चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
या स्पर्धेत रवींद्र इनामदार यांच्या “तिचा पाऊस त्याचा पाऊस” या उत्कृष्ट संहितेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. तर प्रकाश पाठक (पुणे) यांच्या “प्रेम कहाणी” या संहितेने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
स्पर्धेचे परीक्षण रंगभूमी क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व विनीता पिंपळखरे (पुणे) आणि गोविंद गोडबोले (मिरज) यांनी केले. दोन पात्री नाटकाच्या चौकटीत राहून विषयाची मांडणी, संवादांची प्रभावी भाषा आणि संहितेची नाट्यमयता या निकषांच्या आधारे दोन्ही परीक्षकांनी पारितोषिकप्राप्त संहितांची निवड केली.
स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे आणि सहभागी लेखकांचे हिरण्यगर्भ, मिरज संस्थेच्या वतीने मनापासून अभिनंदन करण्यात आले आहे.रवींद्र इनामदार यांच्या या यशाबद्दल आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे डॉ संदीप श्रोत्री,शिरीष चिटणीस ,श्रीराम नानल,मुकुंद फडके यांनी त्यांचे अभिनंदन केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!