सर्वसामान्यातील असामान्य लोकांच्या कथांनी श्रोते भारावले
ग्रंथमहोत्सवात सादर झाली डॉ राजेंद्र माने यांची वळणावरची माणसं
सातारा
येथील जिल्हा परिषद मैदानात आयोजित २४ व्या ग्रंथ महोत्सवात ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजेंद्र माने यांच्या वळणावरची माणसं या ग्रंथातील हिराक्का आणि गुलाबबाई या व्यक्तिचित्रांचे अभिवाचन डॉ अदिती काळमेख , वैदेही कुलकर्णी व चंद्रकांत कांबिरे यांनी केले .
सुत्रसंकल्पना व व्यक्तिचित्रा मागची भूमिका डॉ राजेंद्र माने यांनी मांडली .
अभिवाचनामधील भावपूर्णता आणि आशय या मुळे श्रोतृवर्ग भारावून गेला . गुलाबबाई या तमासगीर बाईचे व हिराक्का या ग्रामीण स्त्रीचे भावचित्र अभिवाचनातून सादर केले गेले .
ग्रंथ महोत्सवाचे कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी सर्वांचे स्वागत केले
प्रदीप कांबळे यांनी आभार मानले .
यावेळी वि ना लांडगे , सुनिता कदम ,युवराज पवार , पत्रकार अनिल वीर प्रल्हाद पारटे , उपस्थित होते .