अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर ३०१ कीर्तने, प्रवचने संकल्प


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रीशताब्दी जन्मोत्सव समितीचा उपक्रम

Advertisement

पुणे
श्री महागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यास संकीर्तनभारती, पुणे , महाराष्ट्र आणि सामाजिक समरसता मंच ,महाराष्ट्र ,गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव समिती यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जीवन चरित्र व त्यांचे कार्य यावर ३०१ कीर्तने प्रवचने व व्याख्याने सर्व समाजात जाऊन करण्याचा संकल्प केला आहे या कार्यक्रमाचा प्रारंभ शुक्रवार दिनांक १० जानेवारी २५ रोजी पुण्यातील धन्वंतरी सभागृह येथे झाला .
या कार्यक्रमास श्री महागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यासाचे संस्थापक व प्रधान विश्वस्त शक्तिपातमहायोग दिक्षाधिकारी , राष्ट्रीय कीर्तनकार श्री हरीकीर्तन चक्रवर्ती श्री मोरेश्वर बुवा जोशी चऱ्होलीकरमहाराज ,जेजुरी मंदिर संस्थान चे माजी विश्वस्त मा. डॉ. श्री प्रसादजी सुधाकर खंडागळे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. डॉ.श्री नंदकुमार एकबोटे तसेच समरसता , गतिविधी पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य मा रवी ननावरे उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि भारत माता व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय कीर्तनकार प.पू. श्री. मोरेश्वर बुवा जोशी चऱ्होलीकर महाराज यांनी केले .त्यानंतर रवी ननावरे यांनी सामाजिक समरसता मंचाच्या कार्याची माहिती सांगितली .
त्यानंतर नंदकुमार एकबोटे व मा.प्रसादजी खंडागळे यांनी आपल्या मनोगतातुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्र सांगितले.
राष्ट्रीय कीर्तनकार श्री मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर महाराज यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर कीर्तन करून सर्व उपस्थित कीर्तनकार प्रवचनकार यांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाची सांगता महाआरतीने झाली.या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड ,निगडी,तळेगाव येथुन कीर्तनकार व प्रवचनकार आलेले होते.सर्व उपस्थितांनी या उपक्रमात सहभागी होणार असे सांगितले. श्री महागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यासाचा साधक परिवार व सामाजिक समरसता मंच यांच्या कार्यकर्त्यांनी उत्तम सहकार्य केले त्यामुळे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!