सकल ब्राह्मण समाजातर्फे नसरापूरमधील घटनेचा निषेध


नराधम आरोपीला फाशी देण्याची निवेदनात मागणी

सातारा
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिचा खून झाल्याच्या घटनेचा निषेध सकल ब्राह्मण समाजातर्फे साताऱ्यात मंगळवारी (ता. ५) करण्यात आला. ब्राह्मण महासंघ आणि अखिल भारतीय ब्राह्मण संघ सातारा शहर शाखेतर्फे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय गृह विभागाच्या नायब तहसीलदार ऋतुजा कदम यांनी ते स्वीकारले.
नसरापूर येथे एक मे रोजी झालेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, सकल ब्राह्मण समाजातर्फे या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. हे अत्यंत निंदनीय कृत्य करणाऱ्या विकृत नराधमाला मरेपर्यंत फाशीच शिक्षा देण्यात यावी ही जनभावना या निवेदनाद्वारे आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, पदाधिकारी प्रशांत आठवले, महेश कुलकर्णी, श्रीकांत वेलणकर, राजदीप माजगावकर, नितीन जोशी, संजय देसाई, अनुजा कुलकर्णी यांच्यासह अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सातारा महिला आघाड़ी कार्यकरी अध्यक्ष दीपाली कुलकर्णी,शहर शाखेच्या प्रज्ञा लाटकर, नीलेश कुमठेकर, सुधीर देशपांडे, ,रवींद्र ताथवडेकर, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके, पत्रकार जयदीप पाठकजी उपस्थित होते.

Advertisement

फोटोओळ : नसरापूरमधील पाशवी अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन नायब तहसीलदार ऋतुजा कदम यांना देताना सकल ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी, नागरिक.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!