नगर वाचनालयात बुधवारी दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन
शासनाच्या वाचन संकल्प पंधरावडा निमित्त उपक्रम
सातारा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा येथे शासनाच्या वाचन संकल्प पंधरावडा निमित्त ग्रंथ प्रदर्शन उपक्रमामध्ये बुधवारी दिनांक 15 जानेवारी रोजी दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले आहे .सातारचे नगर वाचनालय दीडशे वर्षापेक्षा जास्त जुने आहे .त्यामुळे शंभर वर्षांपूर्वीची सुद्धा काही पुस्तके तिथे उपलब्ध आहेत .हे दुर्मिळ असे संदर्भ ग्रंथ आहेत त्यातील काही ग्रंथांचे प्रदर्शन यावेळी आयोजित करण्यात येणार आहे .मराठी भाषेतील अभ्यासकांना या ग्रंथांचा उपयोग होत आला आहे .
या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके आणि प्राध्यापक संजीव बोंडे यांच्या हस्ते होणार आहे .
हा कार्यक्रम बुधवार 15 जानेवारी सकाळी साडेनऊ वाजता नगरवाचनालयात संपन्न होणार आहे .
तरी सर्वांनी या कार्यकमास उपस्थित रहावेआणि हे दुर्मिळ ग्रंथ पाहण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे