माझ्या बापाला लवकरात लवकर फाशी द्या


भीमराव कांबळेच्या मुलानेच केली मागणी

Advertisement

पुणे :
65 वर्षाच्या नराधमाने साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर आता पुणेकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता खुद्द आरोपी भीमराव कांबळेच्या मुलानेच आपल्या वडिलांच्या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. “तो माझा बाप आहे हीच माझी मोठी चूक आहे, त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या,” अशी मागणी मुलाने केली आहे. याशिवाय आरोपीच्या पत्नीनेही म्हटलं की, त्याने जिथे मुलीवर अत्याचार केले, तिथेच त्याला ठेचून मारा.
“जशा वेदना त्या मुलीला झाल्या, तशाच त्यालाही व्हाव्यात”
आरोपीच्या मुलाने आपल्या वडिलांविरुद्ध संताप व्यक्त करताना म्हटले की, त्या निष्पाप चिमुरडीला जितक्या वेदना सहन कराव्या लागल्या, तशाच वेदना आरोपीलाही झाल्या पाहिजेत. वडिलांच्या या विकृत कृत्यामुळे स्वतःच्या कुटुंबाला मान खाली घालावी लागल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.
“पूर्वीही त्याने कुटुंबातील सदस्यांवर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याच्या अशा वागण्यामुळेच आम्हाला घर सोडून जावे लागले होते आणि त्यानंतर आमचा त्याच्याशी कोणताही संबंध राहिला नाही,” असे मुलाने स्पष्ट केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!