संस्कार भारतीची जिल्हा समिती जाहीर
दिलीप चरेगावकर अध्यक्ष,संजय दीक्षित उपाध्यक्ष
सातारा
संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांतामधील सातारा जिल्हा समितीची घोषणा करण्यात आली अध्यक्षपदी दिलीप चरेगावकर यांची,उपाध्यक्षपदी संजय दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली
संस्कारभारतीच्या बैठकीमध्ये जिल्हा समितीच्या इतर सर्व पदांची घोषणा करण्यात आली
इतर नियुक्त्या पुढीलप्रमाणे:रेखा बंड मार्गदर्शक,प्रदीप इनामदार सचिव, संजीवकुमार आरेकर सहसचिव,विजय गजानन कुलकर्णी कोषप्रमुख,
मंचीय कला संयोजक आणि नृत्य विधाप्रमुख सौ नेहा भिडे घाडगे, संगीत विधाप्रमुख सौ योगीता जोशी, नाट्यविधा प्रमुख सौ रसिका केसकर, दृश्यकला संयोजक शेखर हसबनीस, चित्रकला विधाप्रमुख प्रशांत मुंडेकर,भूअलंकरण विधाप्रमुख विश्वास सोनवणे, साहित्य विधाप्रमुख डॉ सुनील देशपांडे,प्रचार प्रसिद्धी प्रमुख मुकुंद फडके
सातारा संयोजन समितीमध्ये साहित्य विधा संयोजक म्हणून श्रीमती सुरेखाताई कुलकर्णी आणि नाट्यविधा संयोजक म्हणून सौ वर्षा साबडे यांची नियुक्ती करण्यात आली
अध्यक्ष दिलीप चरेगावकर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.यावेळी पश्चिम प्रांताचे प्रचारप्रमुख रुपेश कुंभार आणि साहित्य विधा प्रमुख मधुसूदन पत्की उपस्थित होते
रुपेश कुंभार यांनी यावेळी संस्कार भारतीची नवीन रचना विषद केली.संस्कार भारतीच्या विविध कला उपक्रमांची मंचीय कला,दृश्य कला,साहित्य,लोकलला
आणि कला धरोहरअशी रचना करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले
यावेळी रुपेश कुंभार ह्यांची प्रांतकार्यकारिणीवर प्रचारप्रमुख म्हणून आणि पत्रकार श्री मधुसूदन पत्की ह्यांची प्रांताचे साहित्यविधाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल अध्यक्ष दिलीप चरेगावकर ह्यांचे हस्ते शाल,गुलाबपुष्प व मौलिक पुस्तके प्रदान करून सत्कार करण्यात आला.
बैठकीची सुरवात ध्येयगीताने व समाप्ती पसायदान गाऊन झाली
फोटो ओळ
संजय दीक्षित यांचा सत्कार करताना रुपेश कुंभार,शेजारी डॉ सुनील देशपांडे,मधुसूदन पत्की,दिलीप चरेगावकर,प्रदीप इनामदार