‘ मनापासून ‘ लेखसंग्रहाचे दिल्लीत प्रकाशन
भाऊ तोरसेकर व नीलम गोरे यांचे हस्ते प्रकाशन
सातारा
साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने यांनी लिहिलेल्या ‘ मनापासून ‘ या चपराक प्रकाशन प्रकाशित लेख संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आणि नीलम गोरे यांच्या हस्ते दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पार पडले यावेळी चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार व लेखक रवींद्र बेडकीहाळ लेखक एकनाथ आव्हाड उपस्थित होते.
डॉक्टर राजेंद्र माने यांचे हे 26 पुस्तक प्रकाशन ने प्रकाशित केले आहे.या अगोदर डॉ माने यांच्या कांदबऱ्या, कथासंग्रह , लेखसंग्रह , व्यक्तिचित्र संग्रह एकांकिका संग्रह , कवितासंग्रह प्रकाशित आहेत .घडलेल्या घटना ,भोवताल याचे प्रतिबिंब या सर्व लेखांच्या मधून जाणवून येते मानवी भावभावना आणि संवेदना यांचा तरल आलेख म्हणजे हे पुस्तक आहे .
याच कार्यक्रमात चपराक प्रकाशनच्या इतर तीस पुस्तकांचाही प्रकाशन समारंभ पार पडला.

