बीबीए, बीसीए कागदपत्र पडताळणीसाठी मुदतवाढ
१८ ऑगस्ट दुपारी ५ वाजेपर्यंत मुदत
सातारा
Advertisement
महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवलेल्या बी.बी.ए.आणि बी.सी.ए. या व्यावसायिक पदवी प्रवेशासाठी कागदपत्राची नोंद व पडताळणी करण्याची मुदत संपलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्र वेळेत उपलब्ध झाली नसल्याने नोंदणी झालेली नाही. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून दिनांक १८/८/२०२५ दुपारी पाच वाजेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहे पण केंद्रिय प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केलेली नाही अशा इच्छुक विद्यार्थ्यांना नोंदणी व कागदपत्र पडताळणीसाठी फॅसिलीटी केंद्राची सोय रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट प्रवेश कक्षात मोफत करण्यात आली असल्याचे संचालक डॉ.बी.एस. सावंत यांनी सांगितले.

