वार्षिक राशिभविष्य 2025 : कुंभ


वार्षिक राशिभविष्य 2025
2025 च्या पोटात काय दडले असेल याची उत्सुकता सगळ्यांना असेल पुढील वर्षी शनी महाराज 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यामुळे मकर राशीची साडेसाती संपत असून मेष राशीची साडेसाती सुरू होईल 14 मे 2025 रोजी गुरुचा मिथुन राशीत प्रवेश होईल तसेच 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू यांचाही राशी बदल होईल राहू मीनेतून कुंभ राशीत प्रवेश करेल तर केतू कन्येतून सिंह राशीत प्रवेश करील वार्षिक भविष्य पाहताना वरील मुख्य ग्रहांचे राशी बदल आणि इतर सर्व ग्रहांचे गोचर पाहून राशिफल तयार होते

Advertisement

कुंभ
नवीन वर्ष बऱ्यापैकी यशदायक
कुंभ राशीच्या व्यक्तींना 2025 हे नवीन वर्ष बऱ्यापैकी यशदायक ठरेल शनिदेव सध्या तुमच्याच राशीतून भ्रमण करीत असल्याने साडेसातीचाही परिणाम पहावा लागेल परंतु वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल जुन्या कोर्ट केस चा निकाल तुमच्या बाजूने लागेल तुमच्याकडे चोरी झाली असेल तर चोर मुद्दे माला सकट पकडला जाईल. साडेसाती मुळे कौटुंबिक जीवनात मतभेद कलह होतील ज्यामुळे मानसिक त्रास होईल बुद्धी भ्रमित होऊ शकते काही जणांना मायग्रेन किंवा इतर शारीरिक त्रास होऊ शकतात कौटुंबिक वादविवाद टाळण्याचा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा रोगमुक्त होण्यासाठी योग आणि प्राणायाम करीत राहा कुंभ राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल विरोधकही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील हे सगळे असले तरीही परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील साडेसातीची सुरुवात झाल्यापासून तुमच्यावर अनेक आर्थिक संकट आली असतील काहींचे पद किंवा नोकरी गेली असेल आपली माणसंही सोडून गेली असतील किंवा विरोधात गेली असतील पाच वर्षे खूप सहन केले असेल परंतु आता कुंभ राशीच्या व्यक्तींवर शनि देवाची कृपा होईल लवकरच तुम्ही तुमचे पण किंवा नोकरी परत मिळवाल तुमच्या विरोधकांना नेस्तनाबूत कराल 29 मार्च 2025 रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल तुमच्या राशीपासून दुसऱ्या भावात किंवा धनस्थानात गोचर करेल ही उतरती साडेसाती तुम्हाला अनेक प्रकारचे सुख देईल मात्र कोणाशीही अकारण भांडण करू नका कोणालाही दोष देऊ नका आपल्या लोकांशी शत्रू सारखे वागू नका कोणतेही नवीन काम सुरू करताना तज्ञ लोकांचा सल्ला घ्या एवढं केलं तरी तुम्हाला अनेक आघाड्यांवर चांगले यश मिळेल 14 मे 2025 रोजी गुरु ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशि प्रवेश करणार आहे पंचमस्थानातून भ्रमण करणारा गुरु तुमच्यासाठी सर्वात शुभकारक असेल गुरुमुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील यावर्षी विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल धार्मिक कार्यात रुची वाढेल शेअर मार्केट मधून चांगले धनलाभ होतील म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल तर त्यातूनही फायदा होईल धन सन्मान पद प्रतिष्ठा प्राप्त होईल या वर्षात अनेक लोक प्रॉपर्टी विकत घेतील सोने-चांदीचे दागिन्यांची खरेदी होईल तुमच्या व्यक्तिमत्त्वामुळे सामाजिक प्रतिष्ठा मिळेल राजकारणात एखादे महत्त्वाचे जबाबदारीचे पद नेतृत्वाकडून मिळेल वैवाहिक जीवनात वर्षाच्या सुरुवातीला थोडी नकारात्मकता जाणवेल पण जोडीदाराशी योग्य संवाद साधून आणि त्यांना योग्य तो वेळ देऊन तुम्ही वैवाहिक जीवन आनंदी करू शकता 30 मे 2025 रोजी राहूचे भ्रमण कुंभ राशीत तर केतूचे भ्रमण सिंह राशीतून होईल राहू मुळे काही अडचणी येऊ शकतात आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल परंतु व्यवसाय आणि लांबचे प्रवास यातून लाभ होईल केतूमुळे धार्मिक कार्यात भाग घ्याल एकूणच सकारात्मक विचार तुम्हाला आजारापासून दूर ठेवायला मदत करतील कुंभ राशीच्या लोकांना फेब्रुवारी जून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने आव्हानात्मक जातील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!