गुढीपाडवा कोणाला भरभराट देणार?


या ३ राशींचे भाग्य फळफळणार

सातारा
९ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे हा सण खऱ्या अर्थाने काही लोकांसाठी भरभराटीचा ठरणार आहे.चैत्र महिन्याला ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीमुळेच त्याला वैशिष्ट्य प्राप्त होतं. याच नवरात्रीच्या सुरुवातीलाच हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा सण साजरा केला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-तारे विशिष्ट कालावधीनंतर आपली चाल आणि स्थिती बदलतात. त्यातून वेगवेगळे योग तयार होतात. या योगांचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. मग काही राशींना त्यातून सुख मिळतं, तर काही राशींच्या वाट्याला दुःख येतं. यंदाच्या गुढीपाडव्याला ग्रह-ताऱ्यांची स्थिती काही राशींच्या व्यक्तींसाठी प्रचंड अनुकूल असणार आहे. त्यातून त्यांना भरपूर सुख अनुभवायला मिळेल.
हिंदू नववर्षाच्या सुरुवातील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असते. याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. यंदा ही तिथी 9 एप्रिलला आहे. तब्बल 50 वर्षांनी या दिवशी राजयोग निर्माण होतोय. याच दिवशी शश राजयोग, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग आहे. हे तीनही योग अत्यंत शुभ मानले जातात. त्यांच्या कृपेने 3 राशींच्या व्यक्तींना भरभरून सुख मिळणार आहे. त्यांच्या पदरात एवढं ऐश्वर्य पडेल की त्यांचा स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसणार नाही. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत, पाहूया.

Advertisement

मेष : आपल्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत सकारात्मक असणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. नवं काम सुरू करायचं असेल तर त्यातही यश मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील. स्पर्धा परीक्षा द्यायची असेल, तर त्यासाठीही उत्तम काळ आहे.

वृषभ : आपल्यासाठी हे वर्ष शुभ ठरेल. नवीन गाडी किंवा मालमत्ता खरेदीचा योग आहे. उत्पन्न वाढेल, कुटुंबियांसोबत धार्मिक प्रवास होईल. नातेसंबंध सुधारतील. अविवाहितांना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येतील.

कर्क : या नवीन वर्षात आपली सर्व अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. गुंतवणूक करायची असेल, तर हे वर्ष अत्यंत शुभ ठरेल. आपल्याला भरपूर आर्थिक लाभ होणार आहे. कुटुंबात सुख, शांतीचं वातावरण असेल. जोडीदारासोबत चांगला प्रवास होईल. आरोग्यही उत्तम साथ देईल. कर्जातून मुक्ती मिळेल.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!