डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना चिरमुले पुरस्कार
बुधवार दिनांक १५ जानेवारी रोजी पुरस्कार प्रदान कार्यक्रम
सातारा
युनायटेड वेस्टर्न बँकेने बँकेचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांचे स्मरणार्थ स्थापन केलेल्या वा.ग.तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात अमूल्य सेवा देणाऱ्याव्यक्तींचा सन्मान केला जातो. सन्मानचिन्ह व रु.एक लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.या वर्षी ट्रस्टने माननीय पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांनात्यांच्या सार्वजनिक आरोग्य व संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन २०२३ चा ‘चिरमुले पुरस्कार’ देऊन गौरविण्याचे ठरविले आहे.डॉ.हिम्मतराव बावस्कर हे विख्यात वैद्यकीय संशोधक आहेत. ते विंचू विषबाधेच्या उपचारांवरील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत.
डॉ. बावस्कर यांना पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम सातारा येथे बुधवार दिनांक १५ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वा. धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या कै. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात, डॉ. शरद अभ्यंकर यांच्या हस्ते व मा. डॉ.श्री.ज्ञानदेव म्हस्के – व्हाईस चान्सेलर, कर्मवीर भाऊराव पाटील
यूनिवर्सिटी, सातारा यांचे अध्यक्षतेखाली व श्री विकास देशमुख-सचिव रयत शिक्षण संस्था, सातारा यांचे उपस्थितीत आयोजित केला आहे अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त – श्री.दिलीप पाठक,डॉ.अनिल पाटील, डॉ.अच्युत गोडबोले, श्री. समीर जोशी व पुरस्कार समितीचे संयोजक श्री. अरुण गोडबोले यांनी दिली
कोकणात महाड येथे डॉ.हिम्मतराव बावस्कर काम करत असताना त्या ठिकाणी नेहमीच विंचू दंश झाल्याच्या घटना घडत व दुर्गम भागात त्यावर उपचार मिळणे कठीण असे. त्यामुळे त्यांनी विंचू दंशाच्या घटनांवर संशोधन करून प्रभावी उपचार पद्धती विकसित केली ज्यामुळे अनेकांचेप्राण वाचले आहेत. विंचवाच्या विषामुळे प्रामुख्याने माणसाच्याहृदय व फुफ्फुसावर परिणाम होत असल्याचे त्यांनी शोधले व प्रॅझोसिन या औषधाचा वापर करून विंचवाच्या दंशामुळे होणाऱ्या मृत्यू दरात मोठी घट केली. त्यांच्या या संशोधनामुळे ग्रामीण भागात अनेकांचे प्राण वाचले. तसेच त्यांनी या औषधाच्या वापराबाबत सर्वांना माहिती करून दिली. जगभरात अनेक ठिकाणीत्यांची सदर उपचार पद्धती मान्य व प्रचलित झाली आहे.
चिरमुले ट्रस्टने यापूर्वी डॉ.कै.मनमोहन सिंग, डॉ.श्री.विजय भटकर, डॉ.अनिल काकोडकर, कै.रतन टाटा, कै.राहुल बजाज, डॉ.सी.रंगराजन, श्री.गुलजार, डॉ.सायरस पूनावाला,डॉ.राजेंद्रसिंह, आदि आदरणीय व्यक्तिना या पुरस्काराने गौरविलेआहे.तरी सर्वांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे

