अतुलशास्त्री भगरे यांचे गुरुवारी व्याख्यान
ज्योतिष मंडळ सातारा यांच्यातर्फे आयोजन
सातारा
ज्योतिष मंडळ सातारा यांच्यातर्फे ज्योतिषाचार्य, टेलिव्हिजन स्टार, पंडित अतुल शास्त्री भगरे यांचे “असे असणार 2025 वर्ष राशिभविष्य आणि उपासना ” या विषयावर व्याख्यान गुरुवार दिनांक २ जानेवारी रोजी समर्थ सदन, राजवाडा बसस्टॉप जवळ सातारा येथे दुपारी 4 ते 6 या वेळेत आयोजित केले आहे
ज्योतिष मंडळ सातारा ही संस्था गेले 40 वर्षापासून ज्योतिष शास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करत आहे. ज्योतिष महर्षी प्राचार्य रमणलाल शहा हे संस्थेचे अध्यक्ष असून ज्योतिष प्रवीण, ज्योतिष विशारद, ज्योतिष शास्त्री असे ज्योतिष क्षेत्रातील ज्ञान शिकण्यासाठी ज्योतिष वर्ग संस्थेमार्फत चालवले जातात. त्याचबरोबर ज्योतिष अभ्यासक आणि सर्वांसाठी ज्योतिष अधिवेशन , विविध प्रकारची व्याख्याने संस्थेमार्फत आयोजित केली जातात. यातीलच एक भाग म्हणून पंडित अतुल शास्त्री भगरे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे . या व्याख्यानास प्रवेश विनामूल्य असून सर्व समाजासाठी खुला आहे. सातारा वासियांना पंडित अतुल शास्त्री भगरे यांच्या अमोघ वाणीतून प्रत्येक राशीनुसार उपासना कशी करावी याचे विस्तृत विवेचन या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

