ऊर्जा परिवारातर्फे मंगळवारी कार्यशाळा


जीईएम पोर्टलचे इंट्रोडक्शन आणि वर्कशॉप

सातारा
उर्जा परिवाराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जीईएम ( government emarketplace ) पोर्टलचे इंट्रोडक्शन आणि वर्कशॉप मंगळवार २४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे हॉटेल लेक व्ह्यूच्या चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती ऊर्जा परिवाराचे आशुतोष गोखले यांनी दिली

Advertisement

जीईएम पोर्टल उद्योजकांसाठी सुवर्णसंधी आहे हे पोर्टल मध्यस्थ आणि मॅन्युअल प्रक्रिया काढून टाकून एक निष्पक्ष आणि पारदर्शक खरेदी प्रक्रिया सुनिश्चित करते.कार्यालयीन पुरवठा आणि फर्निचरपासून ते IT सेवा आणि पायाभूत सुविधांपर्यंत अनेक वस्तू आणि सेवा ऑफर करते.नोंदणी सुलभ करून आणि लहान व्यवसायांसाठी समान संधी उपलब्ध करून सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देते. मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” सारख्या सरकारी धोरणांशी सुसंगत, एमएसएमई कडून खरेदी वाढवण्याच्या तरतुदी या व्यासपीठावर आहेत.

लिमिटेड सिट असल्याने या कार्यशाळेसाठी लवकरात लवकर आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आशुतोष गोखले यांनी केले आहे

अधिक माहितीसाठी आशुतोष सुनील गोखले 8380000665 या नंबरवर संपर्क साधावा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!