गाण्यांमधून गदिमांच्या आठवणींना उजाळा


प्रदीप देसाई यांच्या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ गीतकार कवी ग दि माडगूळकर म्हणजेच गदिमा यांच्या आठवणींना संगीताच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी पतसंस्था यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या हे चिंचेचे झाड या कार्यक्रमामध्ये मुंबई येथील प्रदीप देसाई यांनी विविध गाणी आणि आठवणी याच्या माध्यमातून गदिमांची प्रतिभाशाली प्रतिमा रसिकांसमोर ठेवली
साताऱ्यातील प्रख्यात गायक कलाकार डॉक्टर सुनील पटवर्धन आणि सौ विभावरी गोडबोले यांनी यावेळी गदिमांची गाणी सादर केली त्याला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गदिमांची गीतरचना आणि सुधीर फडके यांचे गायन किंवा संगीत यांच्या माध्यमातून तयार झालेली विविध गाणी यावेळी या दोन कलाकारांनी सादर केली
कौसल्येचा राम,हे चिंचेचे झाड, धुंद येथ मी स्वैर झोकितो,बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला,विठ्ठला तू वेडा कुंभार,गोरी गोरी पान,मधू इथे अन चंद्र तिथे यासारखी अनेक गाणी यावेळी डॉक्टर सुनील पटवर्धन आणि विभावरी गोडबोले यांनी सादर केली
प्रदीप देसाई यांनी यावेळी सादर झालेल्या गाण्यामागील इतिहास सांगताना अनेक रंजक किस्से सादर केले गदिमा ,सुधीर फडके यांची थोरवी त्यांनी या माहितीच्या माध्यमातून श्रोत्यांसमोर ठेवली
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी गदिमांच्या साहित्यिक कारकीर्दीचा आढावा घेतला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या भाषेचे वैभव वाढवणारे गदिमा यांचे स्मारक उभारण्यासाठी आता माध्यमांनी आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली गदिमांच्या आयुष्यातील काही आठवणींनाही त्यांनी यावेळी उजाळा दिला
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली
आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी सूत्रसंचालन केले
आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे समन्वयक श्रीराम नानल यांनी आभार मानले

Advertisement

फोटो ओळ
प्रदीप देसाई यांचा सत्कार करताना श्रीराम नानल, डावीकडून विभावरी गोडबोले, डॉक्टर सुनील पटवर्धन,मुकुंद फडके,डॉक्टर संदीप श्रोत्री


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!