सातारा येथे शनिवारी गीत रामायण
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नामजपानिमित्त कार्यक्रम
Advertisement
सातारा
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नाम जपानिमित्त आणि सौ.आशाताई दामले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अवघ्या आशा श्रीरामायण अर्थात गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन शनिवार 28 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता समर्थ सदन,सातारा येथे केले आहे,अशी माहिती संयोजक आणि निवेदिका सौ.स्नेहल दामले यांनी दिली.
गीत रामायणाच्या माध्यमातून राम तत्वाची मांडणी या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात अभिजित पंचभाई,श्रुती देवस्थळी,प्रसन्न बाम,अमित कुंटे,उध्दव कुंभार हे नामवंत गायक,वादक सहभागी असून निवेदन सौ.स्नेहल दामले यांचे आहे.या कार्यक्रमाचा लाभ सातारकर रसिकांनी घ्यावा,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

