मंगळवारी ” प्यार किया तो डरना क्या” कार्यक्रम


दीपलक्ष्मी पतसंस्था आणि कला सरगम सातारा यांची प्रस्तुती

सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा आणि कला सरगम सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ” प्यार किया तो डरना क्या ” हा कर्णमधुर गाण्याचा कार्यक्रम दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल,शनिवार पेठ सातारा येथे मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.30 ते 8.30 वाजेपर्यंत आयोजित केला आहे.सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी आणि संगीतकार नौशाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अविस्मरणीय गाण्यांचा हा विशेष कार्यक्रम आयोजित केला असून हा कार्यक्रम विनामूल्य आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दैनिक सकाळचे सहयोगी संपादक राजेश सोळसकर यांच्या हस्ते होणार असून डॉ.कामिनी पाटील, डी. एन. वैद्य, मुकुंद फड़के,अनिल वाळिंबे, मुकुंद पांडे,शिरीष चिटणीस इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

या कार्यक्रमात ॲड. लक्ष्मीकांत अघोर, प्रशांत कुलकर्णी, अरुण कुलकर्णी,ॲड.आशुतोष वाळिंबे, परितोष अघोर, प्रिया अघोर, मधु गिजरे,विजया चव्हाण, ॲड. रेश्मा वाळिंबे, आणि मुकुंद पांडे गायक कलाकार आपली सदाबहार गीते सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल कुलकर्णी करणार असून संकल्पना शिरीष चिटणीस यांची आहे. ध्वनी व्यवस्था कुलदीप पवार यांची असून या कार्यक्रमाचे दिग्दर्शन मुकुंद पांडे यांनी केले आहे.
अशा सदाबहार ,रंगारंग कार्यक्रमास समस्त सातारकर रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन संस्थेचे संस्थापक-चेअरमन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!