एकाच कुटुंबात पाच जण खासदार


उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबाचे आगळे वेगळे रेकॉर्ड

Advertisement

नवी दिल्ली
समाजातील अनेकविध घटना नेहमीच साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. मग ती घटना राजकीय असो किंवा सामाजिक. दरम्यान आता एका राजकीय गोष्टीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एका आगळ्यावेगळ्या रेकॉर्डची सध्या चर्चा सुरु आहे.हा रेकॉर्ड म्हणजे एकाच कुटुंबात पाच जण एकाच वेळी खासदार झाले आहेत. लोकांनी एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना संसदेत पाठवले आहे.
हा रेकॉर्ड झालाय उत्तर प्रदेशात. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांसह कुटुंबातील पाच सदस्य खासदार झालेत. यूपी राजकारणात नेहमीच यादवांचा दबदबा दिसून आला आहे.यंदाच्या लोकसभेला अखिलेश यादव यांच्यासह त्यांच्या पत्नी व चुलत बंधूही खासदार झालेत. अखिलेश यांच्या पत्नी डिम्पल यादव या देखील आता पती अखिलेश यादव यांसह संसदेत दिसतील. अखिलेश यांच्या पत्नी डिम्पल यादव मैनपुरी मतदारसंघातून तर चुलत बंधू धर्मेंद्र यादव आझमगड मतदारसंघातून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.अक्षय यादव आणि आदित्य यादव हे देखील चुलत बंधू असून त्यांनी अनुक्रमे फिरोजाबाद आणि बदायूं मतदारसंघात विजय मिळवलाय. अखिलेश यांचा समाजवादी पक्ष असून या निवडणुकीत त्यांनी 37 जागा जिंकल्या आहेत. यात त्यांच्याच घरातील पाच जागा आहेत. त्यामुळे या निवडणुकीत यादव कुटुंबाचे एक आगळेवेगळे रेकॉर्ड झाले आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!