प्रवास करा आणि आनंदी रहा


सातत्याने प्रवास करणाऱ्या प्रवीण कारखानीस यांचे आवाहन
सातारा
प्रवास करा, अनोळखी भूप्रदेश पहा, अनोळखी लोकांशी संपर्क करा, त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करा असे आवाहन सातत्याने फिरत राहणाऱ्या प्रवीण कारखानीस या निवृत्त बँकरने केले .आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रवीण कारखानीस यांनी श्रोत्यांशी संवाद साधताना आपले अनुभव कथन केले
कारखानीस यांनी 1977 मध्ये मोटरसायकलवरून अन्य सात साथीदारांना सोबत घेऊन मुंबई ते रोम रोम ते मुंबई असा साडेबावीस हजार किलोमीटरचा साहसी आणि प्रदीर्घ प्रवास केला.त्याचे अनुभव त्यांनी विशद केले.
प्रारंभी आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी केलेल्या साहसी प्रवासाचीही माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. अध्यक्षीय समारोपात शिरीष चिटणीस यांनी कारखानीस यांच्या लेखन प्रवासाची माहिती दिली.अशा माणसांच्या संपर्कात आल्याने प्रवासाची आवड निर्माण होते असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीराम नानल यांनी केले आणि कारखानिस व त्यांचे सहकारी मथुरे व देसाई यांना धन्यवाद दिले. सातारा जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला असून येथेही प्रवास करावा अशी विनंती नानल यांनी केली.
या कार्यक्रमास राजकुमार निकम, वि ना.लांडगे, विनायक भोसले व अन्य नागरिक उपस्थित होते.

Advertisement

फोटो ओळ
प्रवीण कारखानीस आपले अनुभव सांगताना,व्यासपीठावर शिरीष चिटणीस, संदीप श्रोत्री, श्रीराम नानल व इतर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!