डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांना श्रद्धांजली


सातारा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयातर्फे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
त्यावेळी बोलताना लेखक डॉक्टर राजेंद्र माने म्हणाले
‘ श्रीनिवास कुलकर्णी यांच्या जाण्याने ललित लेखनातला दीपस्तंभ हरवला आहे. विनम्र मृदूभाषी असणारे श्रीनिवास कुलकर्णी हे लेखक म्हणून आणि माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते .त्यांच्या डोह, कोरडी भिक्षा ,सोन्याचा पिंपळ सारख्या ललित कलाकृती या नवीन पिढीला ललित लेखनाचा आदर्श सांगणाऱ्या आहेत ‘
प्राध्यापक श्रीधर साळुंखे म्हणाले,’श्रीनिवास कुलकर्णी हे सातारा जिल्ह्याचे भूषण होते. मा यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचे साहित्यगुण जाणून त्यांनी कराडमध्ये स्थायिक व्हावे असे प्रयत्न केले होते.
‘बाबुराव शिंदे म्हणाले,श्रीनिवास कुलकर्णी यांच्याशी दोन-तीन वेळा वैयक्तिक गाठीभेटी झाल्या होत्या अतिशय नम्र आणि अभ्यास व्यक्तिमत्व असलेले कुलकर्णी यांनी स्वतः सह्या करून त्यांची पुस्तके भेट दिली होती. त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष पद मिळायला पाहिजे होते. साहित्य क्षेत्रातले त्यांचे योगदान मोलाचे होते .’
प्राध्यापक देवानंद सोनटक्के यांनी,श्रीनिवास कुलकर्णी यांच्या लेखनातले सौंदर्य आणि दर्जात्मकता उदाहरणासहित व्यक्त केली.दुर्गाबाई भागवत यांच्यानंतर श्रीनिवास कुलकर्णी यांचे ललितलेखन अभ्यासपूर्ण व चिंतनशील होते असे मत व्यक्त केले .
कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी नगर वाचनालयया तर्फे श्रीनिवास कुलकर्णी यांना श्रद्धांजली व्यक्त केली व त्यांना वाचनालया तर्फे कादंबरीकार ना ह आपटे पुरस्कार प्रदान केला होता त्याची आठवण सांगितली.
या कार्यक्रमाला पद्माकर पाठकजी, वि ना लांडगे, नंदकुमार शेडगे ,कविता प्रभुणे सुषमा भिडे,रागिणी जोशी, सुप्रिया भिडे ग्रंथपाल रुपा मुळे विष्णू धावडे व वाचक वर्ग उपस्थित होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!