लेखक प्रवीण कारखानिस यांच्याशी संवाद
दीपलक्ष्मी सभागृहात रविवारी कार्यक्रम
सातारा
आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात ज्येष्ठ पत्रकार व लेखक प्रवीण कारखानिस यांच्याशी संवाद कार्यक्रम दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल शनिवार पेठ सातारा येथे रविवार दि.22 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित केला आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एल.बी.एस कॉलेज प्राचार्य राजेंद्र शेजवळ तसेच डॉ. संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, विनोद कुलकर्णी, श्रीराम नानल उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार व लेखक प्रवीण कारखानिस यांनी अनेक वर्षांपूर्वी मोटरसायकल वरून आशिया युरोप आणि आफ्रिका खंडातून प्रवास केले होते या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे
सातारकर रसिक श्रोत्यांनी या संवाद कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन आम्ही पुस्तक प्रेमी तर्फे डॉ. संदीप श्रोत्री व दीपलक्ष्मी पतसंस्थेचे तर्फे चेअरमन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.