पद्माकर पाठकजी यांच्या कथासंग्रहाचे बुधवारी प्रकाशन
नगर वाचनालयाच्या वाचक व्यासपीठ उपक्रमांतर्गत कार्यक्रम
सातारा
ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि लेखक पद्माकर पाठकजी यांच्या रंग प्रेमाचे बदलत्या काळाचे या कथासंग्रहाचे प्रकाशन बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नगर वाचनालय सातारा येथे होणार आहे
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक मधू नेने आणि जेष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने उपस्थित राहणार आहेत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालय यांच्या वाचक व्यासपीठ उपक्रमांतर्गत हा पुस्तक प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे
Advertisement

सातारकर साहित्य प्रेमींनी या प्रकाशन समारंभाला उपस्थित रहावे असे आवाहन नगर वाचनालयाचे अध्यक्ष,कार्यकारिणी सदस्य आणि पाठकजी कुटुंबीय यांनी केले आहे

