यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये सीईटी मार्गदर्शन कक्ष स्थापन


राज्य सामायिक प्रवेश परीक्षा केंद्राकडून सीईटी 2025 चे वेळापत्रक जाहीर

सातारा
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सीईटी परीक्षा घेण्यात येतात सदरच्या सीईटी वेळापत्रकाच्या पार्श्वभूमीवर यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये प्रवेशासाठीच्या सीईटी मार्गदर्शन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
व्यावसायिक आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असते. इंजीनियरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीए, बीबीए आणि बीसीए या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येतो. विद्यार्थ्यांना विविध वसतिगृहांच्या योजनेचे देखील फायदे घेता येतात. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना देखील सीईटी संदर्भात वेळेत मार्गदर्शन होणे अत्यावश्यक असते. म्हणूनच यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये सर्व प्रकारच्या व्यावसायिक आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी सीईटी मार्गदर्शन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सदरच्या मार्गदर्शन कक्षाकडून सीईटी संदर्भात सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सीईटी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची उपलब्धता करून त्यांची ऑनलाइन पद्धतीने तपासणी करून घेतात आणि मग ते केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरतात. अशा पद्धतीने केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणारे विद्यार्थीच प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकतात.

Advertisement

नवीन शैक्षणिक धोरणानुसार यूजीसी व एआयसीटी नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून बीबीए बीसीए या पदवी अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे हे अभ्यासक्रम इंजीनियरिंग पदवीप्रमाणे एआयसीटीइ च्या नियंत्रणाखाली आल्याने महाराष्ट्र शासनाने बारावी पास विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सदरच्या अभ्यासक्रमांसाठी सक्तीची केली आहे.

सीईटी मार्गदर्शन कक्षाचे कार्य आणि महत्त्व:

यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये सर्वच व्यावसायिक आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी सीईटी तसेच प्रक्रियेसंदर्भात मोफत माहिती देण्यासाठी, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामध्ये इंजीनियरिंग फार्मसी व्यवस्थापन आर्किटेक्चर अशा सर्वच प्रकारच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भात, कागदपत्रांसंदर्भात, आणि केंद्रीय प्रवेश प्रक्रिये संदर्भात माहिती घेण्यासाठी साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस ला भेट द्यावी असे आवाहन यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वतीने करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!