रशियाने बनवली कॅन्सरची लस


लस सर्वांना मोफत मिळणार
मॉस्को
कर्करोगासारख्या गंभीर आजाराबाबत रशियाने मोठा दावा केला असून कर्करोगाची लस तयार केल्याची घोषणा केली आहे. ही लस सर्व रुग्णांना मोफत मिळणार आहे. ही लस ट्यूमरची वाढ रोखू शकते, असा दावा रशियाने केला आहे.
आज संपूर्ण जग कर्करोगासारख्या गंभीर आजाराने हैराण झाले आहे. अशा परिस्थितीत रशियाचा हा दावा संपूर्ण जगासाठी दिलासा देणारा ठरणार आहे.

Advertisement

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की ही कर्करोगाविरूद्धची 2025 च्या सुरुवातीला लाँच केली जाईल. रशियातील कर्करोगाच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील. रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी या लसीबद्दल माहिती दिली. मात्र, ही लस कोणत्या कर्करोगावर उपचारासाठी विकसित करण्यात आली आहे आणि ती किती प्रभावी आहे हे सध्या स्पष्ट झालेले नाही.

या लसीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. उर्वरित जगाप्रमाणे रशियामध्येही कर्करोगाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. 2022 मध्ये 635,000 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
स्तन आणि फुफ्फुसाचा कर्करोग हे देशातील या आजाराचे सर्वात सामान्य प्रकार आहेत. या लसीबद्दल असे सांगण्यात आले आहे की ही लस केवळ ट्यूमरच्या वाढीचा वेग कमी करणार नाही, तर त्याचा आकार देखील कमी करेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!