विशेष मतदान केंद्रांमुळे भारावून गेले कोरेगावकर


जवानांना समर्पित आणि महिलांना समर्पित मतदान केंद्र

Advertisement

कोरेगाव
तांदुळवाडी चे जवानांना समर्पित मतदान केंद्र, कोरेगाव आणि खिंडवाडी चे महिलांना समर्पित ‘सखी मतदान केंद्र’, भिवडीचे दिव्यांग बांधवांना समर्पित केंद्र, देऊरचे आणि संगम माहुली येथील युवा मतदान केंद्र अशी विशेष मतदान केंद्रे पाहून, तेथील सजावट पाहून आणि समर्पण भावना पाहून कोरेगावकर मतदार भारावून गेले! तांदूळवाडीला विशेष कौतुकाचा मान मिळाला, अशी माहिती जनजागृती पथकाचे नोडल ऑफिसर धनंजय चोपडे आणि पथकप्रमुख यशेंद्र क्षीरसागर यांनी दिली. तांदूळवाडीला जय जवान केंद्र अत्यंत आकर्षक पद्धतीने उभारण्यासाठी डी. पी .भोसले कॉलेजचे प्राध्यापक बाळकृष्ण भोसले आणि त्यांचे एनसीसी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. असे देखील त्यांनी सांगितले.मतदान जनजागृतीचाच एक भाग म्हणून विशिष्ट मतदान केंद्र काही घटकांना मध्यवर्ती ठेवून ही केंद्रे उभारली होती. यामध्ये दिव्यांग, महिला, जवान,
आणि युवा यांचा समावेश आहे. कमान, कविता, सेल्फी यामुळे विशेष सखी महिला मतदान केंद्रे गजबजुन गेली .युवा मतदान केंद्रावर देऊर आणि संगम माहुली येथे तरुणांचे स्फूर्तीस्थान असलेले स्वामी विवेकानंद यांची सुंदर कविता प्रदर्शित करण्यात आली . महिला विशेष केंद्रावर स्त्रियांचे विविध भूमिकेतील गुणगान करणारी कविता सर्वांना आकर्षित करीत होती.एकंदरीतच अशी विशेष मतदान केंद्र प्रेरणादायी ठरली ,अशा भावना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांनी व्यक्त केल्या .यावेळी तहसीलदार डॉ
संगमेश कोडे,निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे उपस्थित होत्या. मतदानाचा टक्का वाढवणे किंबहुना शंभर टक्के मतदान होणे यासाठी जनतेपर्यंत पोहोचणे हे ध्येय ठेवून अनेक उपक्रम राबवले गेले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!