कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वक्तृत्त्व स्पर्धेला मोठा प्रतिसाद


झाशीची राणी जयंतीनिमित्त बापूसाहेब चिपळूणकर शाळेत आयोजन
सातारा
झाशीच्या राणीच्या जयंतीनिमित्त कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या सातारा शाखेतर्फे येथील बापूसाहेब चिपळूणकर शाळेमध्ये घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनींनी झाशीच्या राणीच्या वेशभूषेसह वक्तृत्त्व सादर केल्यामुळे सारे वातावरण भारावून गेले होते.
बापूसाहेब चिपळूणकर शाळेतील पाचवी, सहावी आणि सातवीतील विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धक मुलींनी अत्यंत त्वेषाने आणि निर्भीडपणे वक्तृत्व कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब भाटे यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर परीक्षकांनी निवडलेल्या विजेत्यांना पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळेसाठी क्रीडासाहित्य भेट देण्यात आले. स्वागतगीत आणि दीपप्रज्वलानंतर शाळाप्रमुख संदीप मस्के यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे सचिव सुधीर करंबेळकर यांनी संघाच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली. संघाच्यावतीने सर्व समाजासाठी उपयुक्त ठरतील अशा स्वरुपाच्या कार्यक्रमांचे आयोजन वर्षभर सातत्याने होत असल्याची माहिती करंबेळकर यांनी दिली. मुख्याध्यापक मस्के आणि त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यांनी उत्कृष्टपणे स्पर्धेचे आयोजन केले. अभिजित डांगे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अनिलराव काटदरे, उपाध्यक्ष बाळासाहेब भाटे, सचिव सुधीर करंबेळकर, सदस्या सौ. विजयालक्ष्मी फणसळकर व माजी नगरसेविका सौ. प्राची शहाणे, सौ. अजया करंबेळकर, विश्‍वास पराडकर आदी प्रमुख उपस्थित होते.
फोटो ओळ
वक्तृत्‍व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणप्रसंगी मुख्याध्यापक म्हस्के, अनिलराव काटदरे, बाळासाहेब भाटे, सौ. अजया करंबेळकर, सौ. प्राची शहाणे, सौ. विजयालक्ष्मी फणसळकर, विश्‍वास पराडकर, सुधीर करंबेळकर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!